HW News Marathi
महाराष्ट्र

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात – डॉ. वीरेंद्र तावडेला जामीन

कोल्हापूर | कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्र तावडेला कोल्हापूरातील जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी जून २०१६मध्ये पानसरे हत्या प्रकरणी तावडेला अटक करण्यात आले होते. तावडे यांनी कोल्हापूरात येऊन रेकी करुन शस्रास्राची व्यवस्था केल्याचा आरोप होत आहे.

न्यायालयाने तावडेला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले असून कोल्हापूर शहरात येण्यास मज्जाव केला आहे. या हत्ये प्रकरणातील साक्षीदारांवर कोणत्याही दबाव आणण्याचा प्रयत्न करु नये. तसेच दर शनिवारी एसआटीसमोर हजेरी लावाण्याच्या अटींवर न्यायालयाने तावडेचा जामीन मंजूर केला आहे.

तसेच तावडे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येमध्ये देखील मुख्य संशयित असून या हत्येचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणातील साक्षीदार संजय साडविलकर यांनी दिलेल्या साक्षीत तावडे यांचे नाव पुढे आले असून त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका संघर्षमय जीवनाचा अंत झाला,घरची परिस्थिती हलाखीची असतानाही बँकेची परीक्षा पास झाली, डेंग्यूने तरुणीचा जीव घेतला.:

News Desk

‘सामना’च्या अग्रलेखातील गलिच्छ भाषेबाबत चंद्रकांत पाटील रश्मी वहिनींना पत्र लिहिणार

News Desk

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्यापूर्वीची वाझेंची हालचाल CCTV त कैद

News Desk