HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंग यांची ठाकरे सरकारविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात धाव

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली असून नव्याने याचिका केली आहे. परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला यावेळी आव्हान दिलं आहे. तसेच त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेलं पत्र मागे घेण्यासाठी दबाव असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तसंच राज्य सरकार एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला असून उच्च न्यायालयात ४ मे रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

या आधी परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने परमबीर आणि अन्य दोघांनी केलेल्या जनहित याचिका रद्द केल्या होत्या. “नियुक्ती किंवा बद्दल्यांबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी योग्य त्या व्यासपीठाकडे दाद मागावी. कारण त्यांनी केलेले आरोप हे सेवेशी संबंधित आहेत,” असं न्यायालयाने स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी देशमुख व सिंह यांच्यासह याप्रकरणी गुंतलेल्यांविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची अ‍ॅड्. जयश्री पाटील यांची याचिकाही न्यायालयाने निकाली काढली होती.

तसेच, परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात अकोल्यातील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध २२ कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेचा फक्त झेंडा बदलला, भूमिका नाही !

swarit

रत्नागिरीत १९ पैकी १४ जण कोरोना निगेटिव्ह तर ५ जण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह

swarit

#MahalaxmiExpress : ५०० प्रवाशांना एनडीआरएफने वाचविले

News Desk