मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाचा अग्रलेख आणि आपल्या व्यक्तव्याच्या माध्यमातून भाजप व केंद्र सरकारवर गरळ ओकण्याचा प्रयत्न केला आहे. देशामधील ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी सर्व यंत्रणांचा केंद्राकडून गैरवापर होत असल्याचा बिनबुडाचे आरोप ते करत असून पुन्हा पुन्हा ढोलकी वाजवून जनतेच्या मनात विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम हटविण्याचे शिवसेनेने सुरुवातीस समर्थन केले पण आता शिवसेना उलट भूमिका घेत असून यामधून शिवसेनेची दुट्टपी भूमिका दिसत आहे. संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरच्या सुरक्षेची काळजी करू नये असा सल्लाही दरेकर यांनी दिला. ते म्हणाले, देशाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला गृहमंत्री अमित शहा सक्षम आहेत. चीनचे आक्रमण असो वा काश्मीरची सुरक्षा, वा सर्जिकल स्ट्राईक या सर्व विषयांवर टोकाचे पाऊल उचलण्याची धमक मोदी सरकरामध्ये असल्याचे महाराष्ट्रातील जनतेन पहिलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्थेकडे पाहावे. आज महाराष्ट्रात अराजकता निर्माण झाली आहे. महिला असुरक्षित आहेत, राज्यात खून, आत्महत्या होत आहे त्यामुळे संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरपेक्षा महाराष्ट्रातील अराजकतेवर बोलावं. या विषयी आपल्या महाविकास आघाडी सरकारला सल्ला देऊन जर काही कारवाई झाली तर आपलं नक्कीच अभिनंदन करू असा टोलाही दरेकर यांनी मारला.
ते पुन्हा सांगायला भाग पाडू नका
सामनामधून अत्यंत खालच्या पातळीवर टीका सुरू आहे, आमचे नेते गांजा घेतात की काय असं बोललं जातं. ड्रग्स, गांजाची बाजू कोण घेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. अभियंता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात काय झालं हे सुध्दा महाराष्ट्राला माहीत असून ते पुन्हा पुन्हा सांगायला भाग पाडू नका. तसेच कोणाचे जावई ड्रग्ज मध्ये अटक होते हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे ड्रग्ज व गांजा विषयावरुन भाजपवर आरोप करताना महाराष्ट्रामध्ये कोण ड्रग्ज व अमली पदार्थच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन त्याला पाठींबा देतो व कोण अंमली पदार्थाच्या विरोधातील कारवाईच्या बाजूने उभं राहतो हे महाराष्ट्र पाहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकांचे डोळे दिपतील की फिरतील हे कळेल
शंभर कोटीची वसूली असो वा भ्रष्टाचाराचा कारभार तसेच राज्यातील महिलांवर होणारे प्राणघातक हल्ले यामुळे आज राज्यातील जनतेचे डोळे नक्कीच फिरले असणार. शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपये हेक्टरि मदत करू असे आवाहन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी दिलं. राष्ट्रवादीने तर राज्यपालांना निवेदन देऊन एक लाख रुपये द्या अशी मागणी केली. पण ती दुर्लक्षित करून आता दिलेले पुरग्रस्तांसाठी १०,००० कोटीच्या मदतीमध्ये विभागले तर प्रत्येकी किती रुपये कोणाला मिळणार हे सुद्धा गणित संजय राऊत यांनी सांगावं म्हणजे लोकांचे डोळे दिपतील की फिरतील हे निश्चितपणे दिसून येईल.
…याची आठवण आपल्याला नाही का ?
संजय राऊत सामनातून आठवण करून देत आहेत की, लोकांनी लपून छपून कड्या कुलूपांत शपथ घेतली. परंतु ते हे सोयीस्कर सांगायला विसरतात की, शपथविधीस उपस्थित असलेले अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून आपण सरकार बनवत असताना आपल्याला या गोष्टीची आठवण राहिली नाही का? राज्याचा कारभार चालवत असताना ते सुध्दा त्या शपथविधी सोहळ्यास सोबत होते याचा विसर जाणीवपूर्वक संजय राऊत यांना पडला असावा असा टोलाही त्यांनी लागवला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.