HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ सीडीची मी वाट बघतोय!

पुणे | भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे म्हटले होते. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी ‘ईडी’च्या कारवाईवर तोफ डागत अप्रत्यक्षपणे भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता यावर भाजपचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन – एकनाथ खडसेे

मी भाजपसाठी खास्ता खल्ल्या. काही वेळा लोकांची बोलणीही खाल्लीत. लोकं आमच्यावर थुंकलेत. तरीही मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्याचे मला काय फळ मिळाले, असा सवाल करत भाजपवर एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली. मी कोणताही घोटाळा केला नाही. भ्रष्ट्राचाराचा आरोप झाला नाही. तरीही मला डावलले गेले. मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तुमच्या पाठीमागे ईडी लावली जाईल. त्यावेळी तुम्हा काय करणार, असा सवाल करण्यात येत होता. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विचारले तुम्ही राष्ट्रवादीत येणार आहे का, त्यावेळी ते तुमच्या मागे ईडी लावतील, असे म्हणाले. त्यावेळी मी सांगितले, मी सीडी लावेन, असे रोखठोक मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसे यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले.

एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने नुकतीच एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही तब्बल 9 तास कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे ईडीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. चौकशीवेळी आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य दिलंय. या चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आलीय. ईडीने स्टेटमेंट्सची सत्यता तपासलीय. याशिवाय ईडीला जे कागदपत्रे हवी होती ती सगळी दिलीत. ईडीला आणखी काही कागदपत्रे हवी होती ती कागदपत्रे 10 दिवसात जमा करण्यास सांगितलं आहे. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असे एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ठाकरे सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक’, राजू शेट्टींचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी बोलावले बैठकीला!

News Desk

“रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात”, फडणवीसांच्या “त्या” वक्तव्यावर काँग्रेसची टीका

News Desk

“मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो”, निलेश राणेंचा टोला

News Desk