HW News Marathi
Covid-19

उद्यापासून पुण्यातील उद्याने बंद, महापौरांची माहिती

पुणे | राज्यातील कोरोनाचा कहर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता उद्यापासून (१८ जून) शहरातील उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. “कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत शहरातील ३३ उद्याने उद्यापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील सूचना आपण प्रशासनाला केली होती. माझी पुणेकर नागरिकांना मनापासून विनंती आहे, सहकार्य करुन प्रशासकीय सूचनांचे पालन करावे”, असे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“अनलॉक १ नावाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्यात नागरिकांना काही बंधने घालून उद्याने आणि मैदाने खुली करण्यात आली. मात्र, नागरिकांकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले. उद्यानात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नेमावे लागले. आधीच अपुरे कर्मचारी असताना गरजेच्या नसलेल्या बाबींना प्राधान्य नको”, अशी भूमिका घेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्याने बंद करण्याचा आग्रह धरला होता. महापुरांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे तशी मागणीच केली होती. त्याची ही मागणी अखेर मान्य झाल्याचे वृत्त आहे.

संपूर्ण देशातील राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा आहे. त्यातही राज्यातील मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये सुरुवातीपासूनच कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या या शहरांमधील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणणे हे शासन, प्रशासनापुढ़े मोठे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर, हा संसर्ग टाळण्यासाठी पुणे प्रशासनाकडून शहरांतील उद्याने बंद करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा

पुण्यात मंगळवारी (१६ जून) नव्याने २९३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०,१८३ झाली. तर १५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३,११८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे शहरातील एकूण तपासणी इतकी ७६,२०६ झाली असून मंगळवारच्या एका दिवसात २,५४७ स्वॅब घेण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या

News Desk

भिडेंचं वक्तव्य म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ ! अजित पवारांकडून कारवाईचा इशारा

News Desk

राजू शेट्टींची ‘ही’ लुटूपुटूची लढाई, ते सरकारी आंदोलक !

News Desk