HW News Marathi
Covid-19

भिडेंचं वक्तव्य म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ ! अजित पवारांकडून कारवाईचा इशारा

मुंबई । देशासह राज्याची कोरोनास्थिती एकीकडे दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असताना संभाजी भिडे यांनी कोरोनासंदर्भातील एक अत्यंत संतापजनक वक्तव्य केले आहे. मात्र, या वक्तव्यामुळे आता संभाजी भिडेंच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. भिडेंच्या या वक्तव्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कारावाईचे संकेत दिले आहेत. “भिडेंचं वक्तव्य म्हणजे वक्तव्य तपासून त्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “या माणसाने आधी बागेतल्या आंब्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यात आता केलेले वक्तव्य म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धीचा प्रकार आहे. त्यांचे नेमके वक्तव्य काय हे तपासून या प्रकरणी कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी पंढरपुरात बोलताना दिली आहे.

कोरोनामुळे मृत्यू होणारी माणसे जगण्याच्या लायकीचीच नाहीत !

लॉकडाऊनला विरोध करताना संभाजी भिडेंनी कोरोनासंदर्भात काही संतापजनक वक्तव्ये केली आहेत. संभाजी भिडे म्हणाले की, “कोरोना असा मुळात रोगच नाही. कोरोनामुळे मृत्यू होणारी माणसे जगण्याच्या लायकीचीच नाहीत. मास्क लावण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला. मास्क लावण्याची काहीही गरज नाही”, असे भिडे म्हणाले. त्यापुढे भिडे असेही म्हणाले की, “लॉकडाऊन विरोधात लोकांनी बंड करायला हवा. असे नियम करणाऱ्या सरकारला फेकून द्यायला हवे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ व्हिडिओमुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

News Desk

राज्यात आज ११,०६० रुग्ण झाले कोरोनामुक्त

News Desk

उद्धवजी लाॅकडाऊनपेक्षा संचारबंदी करा !आव्हाडांची मागणी ..

Arati More