बीड | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना तारखेला न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयाने दिला आहे. राज ठाकरेंना मुंबई येथे अटक केल्यामुळे परळी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंन्टवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक करून बसचे समोरील काच फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणात राज ठाकरेंनी चिथावणी दिली
मजकुरावर परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा कलम 143 427 336 109 भा दं वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रकरण जुने असून राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांनी जामीन करुनही न्यायालयात सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे.
शंकर शेषेराव पांचाळ गंगाखेड दे पो च्या चालकाने 22 10 2008 ला गुन्हा परळी ग्रामीण ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरेंच्या गैरहजेरीमुळे आरोपीविरुद्ध न्यायालयाला चार्ज फ्रेम करण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे राज ठाकरे विरुद्ध पकड वारांत काढण्यात आले आहे. ४ फेब्रुवारी २००९ ला चारशीट दाखल करण्यात आले तेव्हा पासून आज पर्यंत तब्बल ८३ वेळा तारखा काढण्यात आल्या मात्र राज ठाकरे हे गैरहजर राहिल्याने हे न्यायालयाने आदेश दिले आहेत. दरम्यानच्या काळात राज ठाकरे यांनी न्यायालयाच्या हाजरी पासून सूट मिळण्यासाठी आज केला होता. मात्र, परळी न्यायालयाने तो तेव्हाच फेटाळला असल्यामुळे राज ठाकरें विरोधात अटक वारंट काढण्यात आले आहे.
सार्वजनिक मालमत्ता नुकसान केल्यामुळे राज ठाकरेंवर कायदा राज ठाकरे, संजय उत्तम आघा, अनिस सुजात बेग, शिवदास कचरूबा बिडगर, प्रल्हाद राधाकिशन सुरवसे आणि राम ज्ञानोबा लटपटे या सर्वांवर कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी १० फेब्रुवारी परळी न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते आणि १३ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राण्याससंदर्भात सांगितले होते. मात्र, राज ठाकरे हे १३ एप्रिलपर्यंत कोर्टात हजर न झाल्याने पुन्हा दुसऱ्यांदा परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट काढले आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.