HW News Marathi
महाराष्ट्र

रुक! अभी तय नही है, किसके घर जाना है…संजय राऊतांचे वादग्रस्त ट्विट

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापे मारले होते. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे. या कारवाईनंतर शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत ईडी आणि सीबीआय या यंत्रणांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये दोन कुत्रे दिसत आहे. यातील एका कुत्र्यावर सीबीआय, तर दुसऱ्या कुत्र्यावर ईडी असे लिहिले आहे. रुक! अभी तय नही है, किसके घर जाना है… असे लिहिले आहे. विशेष म्हणजे या फोटोच्या उजव्या कोपऱ्यात महाराष्ट्र असे लिहिले आहे. संजय राऊतांनी हा फोटो ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्वीटला हजारो नेटकऱ्यांनी लाईक केले आहे.

 

काय आहे प्रकरण?

ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते मुंबईत परतले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच माहिती नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाणी तापवण्याच्या किरकोळ कारणावरुन सासऱ्याने सुनेचे हात तोडले

News Desk

संदीप क्षीरसागरांचे खंदे समर्थक जयदत्त क्षीरसागरांच्या उपस्थितीत आज हातात शिवबंधन बांधणार

Aprna

Pune wall collapse : निष्काळजीपणा करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा !

News Desk