मुंबई। हिवाळी अधिवेशन हे आजपासून सुरु झालं असून आता आजच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कारण गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरू होत. आणि नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे तीनही वादग्रस्त कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. त्यानंतर कॅबिनेटनेही त्याला मंजुरी दिलीय. पण प्रत्यक्षात तीनही कायदे रद्द करणारं विधेयक आजच अधिवेशनात मांडलं जाईल आणि त्यानंतर इतर प्रक्रिया पार पडेल. विरोधी पक्षही फक्त तीन वादग्रस्त कृषी कायदेच नाही तर एमएसपीचा मुद्दा, महागाई अशा मुद्यावरही सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तसे संकेत विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर मिळालेत. त्यामुळेच केंद्र सरकारविरोधात पहिल्या दिवसापासून विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. आणि एकंदरीतच हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच आता वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरही आवाज उठवण्याची घोषणा
संसदेच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस असेल.आणि पंतप्रधान मोदींनी देशाला तीन कृषी कायदे रद्द करण्याचं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली जाणार का? या कायद्यांबाबत काय होणार? पण विरोधी पक्षाच्या अजेंड्यावर सत्ताधारी पहायला मिळतील. तसच काँग्रेसनं पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरही आवाज उठवण्याची घोषणा केलीय. पण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचही पहायला मिळालं. त्यामुळेच मोदी सरकारविरोधात विरोधकांचा आवाज किती एकजुटपणे उठेल याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
We raised issues of farmers, Chinese aggression, inflation, diesel & petrol prices, unemployment, price rise of essential commodities&flood compensation. The VP asked us to cooperate for smooth run of RS. We requested him to ask Govt to take every party along: LoP in RS, M Kharge https://t.co/3YdyKY6GGB pic.twitter.com/3TtWNMG6by
— ANI (@ANI) November 28, 2021
विरोधकांच्या निशाण्यावर सातत्याने आता महागाई, कोरोना, आणि एमएसपी विधेयक प्रामुख्यानं आहे. अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षांची काल बैठक पार पडली. त्या बैठकीतही याच मुद्यांवरून खडाजंगी पहायला मिळाली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.