HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार कुटुंबासह आज काटेवाडीत, श्रीनिवास पवारांना भेटणार

मुंबई | सध्या राजकीय वातावरण हे अस्थिर झाल्याने दिसून येत आहे. कारण आहे अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआयकडे चौकशी देण्याच्या मागणी केली होती. त्यावरून पार्थ यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना कवडीची किंमत नाही असे म्हणत फटकारले होते. यावरून पवार कुटुंबात नाराजी आणि कलह असल्याचे दिसून आले. यासाठी अजित पवार आणि पार्थ पवार आज (१५ ऑगस्ट) काटेवाडी या आपल्या मुळ गावी जाणार असून त्यांच्या कुटुंबाची तेथे बैठक होणार आहे. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या समवेत ही बैठक होणार आहे.

पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे दुखावले गेले. नाराज झालेले पार्थ पवार हे मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मोठा निर्णय घेण्याआधी पार्थ पवार कुटुंबातल्या व्यक्तींशी चर्चा करत असल्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान पार्थ पवार यांनी १३ ऑगस्टला शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन सुप्रिया सुळेंची भेट घेतली. जवळपास सव्वादोन तास पार्थ पवार सिल्व्हर ओक बंगल्यावर होते. तर सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांचीही भेट घेतली. त्यामुळे आता पवार कुटुंबाच्या या बैठकीत काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“थोतांडाच्या माध्यमातून भाजपा करतंय हिंदू धर्माचं विकृतीकरण”, सचिन सावंत यांचा घणाघात!

News Desk

“माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मी घाबरून घरात बसलो तर यांनी कोणाच्या दारात बसायचं” – निलेश लंके

News Desk

ST संपावर पुढील सुनावणी २२ डिसेंबरला होणार

Aprna