HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

पार्थ पवार आजोबांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पार्थ पवार भेटीला गेले आहेत. दरम्यान, काल (१२ ऑगस्ट) शरद पवार यांनी पार्थ पवार यांना कवडीची किंमत नाही असे म्हणत पार्थ यांना फटकारले होते.

त्यानंतर काल संध्याकाळी अजित पवार, सुप्रिया सुळे , जयंत पाटील यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती. त्यांच्यात नेमकी काय बोलणे झाले आणि पुढे ते काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आज दुपारीही सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. जवळपास १० मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मतदारसंघाच्या कामासाठी सुप्रिया सुळे अजित पवारांना भेटल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार, पार्थ पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापैकी कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

काय आहे प्रकरण?

“पार्थ पवार अपरिपक्व. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही”, असे म्हणत शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांत राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि शरद पवारांविरोधात अशी एक वेगळी भूमिका घेताना दिसून आली होती. राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांची नाराजी अगदी उघडपणे दिसून आली. अयोध्या राम मंदिराचा मुद्दा असो वा बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण याविषयी पार्थ यांनी घेतलेली भूमिका हि पूर्णपणे राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि राष्ट्रवादीविरोधात दिसून आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. त्यानंतर, पार्थ यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचीही प्रतिक्रिया आली. मात्र, आता खुद्द शरद पवारांनी याविषयी नाराजी व्यक्त केली“.माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही”, असे शरद पवारांनी म्हटले होते.

 

 

Related posts

हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे !

अपर्णा गोतपागर

Palghar Mob Lynching: ‘त्या’ शब्दांचा चुकीचा अर्थ लावून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, राजकारण करण्याची वेळ नाही !

News Desk

अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

News Desk