HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांतसिंग प्रकरणी पार्थ पवारांनी केले ‘हे’ ट्विट !

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामूळे महाराष्ट्र सरकारला आणि मुंबई पोलिसांना झटका बसला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांत प्रकरणी सत्यमेव जयते असे ट्विट केले आहे. त्यामुळे आता पवार कुटुंबात नव्या वादाला सुरुवात होणार का अशी शंका आहे.

 

दरम्यान, या आधी राष्ट्रवादी कॉंग्रसेचे अध्यक्ष आणि पार्थ पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी पार्थ यांच्या म्हणण्याला कवडीची किंमत नाही असे म्हटले होते. कारण पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी केली होती. त्यावरून पार्थ पवारांना शरद पवारांनी फटकारले होते. त्यानंतर पवार कुटुंबाकडून पार्थ यांची समजूत काढण्यात आली होती. काही बैठका झाल्या होत्या. आणि सर्व काही सुरळीत झाले अशी माहिती होती. मात्र, आता पार्थ पवार यांच्या या ट्विटने राजकारणात पुन्हा चर्चा सुरु होणार यात शंका नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केली होती. ‘सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी योग्य चौकशी व्हावी अशी भावना संपूर्ण देश आणि विशेषत: तरुणांची आहे. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी.’ असं ट्विटही पार्थ पवार यांनी केलं होतं. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही मागणी फेटाळून लावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीनंतर मंदिरे सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत…

News Desk

सोलापूरमधील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

News Desk

नवीन वर्षात बळीराजाचे राज्य येवो, अन्नदात्याला सुगीचे दिवस येवो! – नाना पटोले

Aprna