मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार या ना त्या कारणांमुळे सध्या चर्चेत आहेत. आज (२ ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ‘तुमच्या कृतीमुळेकाय घडेल याची तुम्हाला कल्पना नसते पण जर तुम्ही कृती केलीच नाही तर हाती काही लागणार नाही’ असे महात्मा गांधींचे विचार ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
“You may never know what results come of your actions, but if you do nothing, there will be no results.”
– Mahatma Gandhi#GandhiJayanti— Parth Pawar (@parthajitpawar) October 2, 2020
पार्थ यांच्या या ट्विट सारखेच त्यांचे सध्याचे एकंदर वर्तन दिसून येत आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणी दरम्यान त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आपण सगळ्यांनी पाहिली होती. त्यानंतर अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केलेली देखील आपण पाहिली आहे. आणि त्यासाठी आजोबा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना जाहीर फटकारलेही होती. पार्थ यांच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही असे शरद पवार म्हटले होते.
इतकेच नाही तर या नंतर पवार कुटुंबाच् नाराजी नाट्यही सगळ्यांनी पाहिले होते. दरम्यान, पार्थ पवारांची सुशांतची केस सीबीआयकडे नेण्याचा मागणी जरी फेटाळली असली तरी नंतर विरोधी पक्षाच्या मागणीने ती सीबीआयकडेच देण्यात आली. यावरुनच पार्थ यांनी आज जे ट्विट केले आहे ते साजेसे वाटते. आताही त्यांनी मराठा आरक्षणात उडी घेतली आहे. यावर देखील भविष्यात काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.