HW News Marathi
Covid-19

लंडनहून १० जण रत्नागिरीत, कोकणाची चिंता वाढली!

रत्नागिरी | राज्यात एकीकडे कुठेतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत होतीच, तितक्यात नव्या कोरोना प्रजातीने गोंधळ उडवला आहे. कोरोनाची नवी प्रजाती आढळून आल्याने संपूर्ण ब्रिटनमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानसेवाच बंद केली आहे. भारतातही खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, रत्नागिरीत गेल्या १० दिवसात १० प्रवासी लंडनहून आल्याचे आढळून आल्याने रत्नागिरीच नव्हे तर संपूर्ण कोकणात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाची दहशत निर्माण झाल्याने भारतातही गेल्या काही दिवसात ब्रिटनमधून आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. ही शोधाशोध सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात लंडनवरुन १०जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील दहा दिवसांत हे दहा जण जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्या नावांची यादी आरोग्य यंत्रणेला विमानतळ प्रशासनाकडून मिळाली. तात्काळ या दहाही जणांचा शोध आरोग्य यंत्रणेने घेतला असून यापैकी ७ जण हे रत्नागिरी तालुक्यातील तर ३ जण संगमेश्वर तालुक्यातील असल्याचं आढळून आलं आहे.

रत्नागिरी तालुक्यातील ७ जणांपैकी एकजण चेन्नईला तर दुसरा रायगडला गेला आहे. उरलेले पाच जण रत्नागिरी शहरातील असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची स्वॅब टेस्ट करून त्यांना एमआयडीसी येथे विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्यावरील उपचाराबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. शिवाय हे दहाही जण गेल्या दहा दिवसांत कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याची यादी तयार करण्यात येत असून या नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, रत्नागिरीत लंडनहून आलेले दहाजण सापडल्याने कोकणातील ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नफेखोरी करणाऱ्या मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा !

News Desk

राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार | अजित पवार

News Desk

L6 आणि L8 परवाने असलेली मद्यविक्री दुकाने सुरु करण्यास दिल्लीत परवानगी

News Desk