HW News Marathi
Covid-19

L6 आणि L8 परवाने असलेली मद्यविक्री दुकाने सुरु करण्यास दिल्लीत परवानगी

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसरा लॉकडाऊन हा सुरु आहे. पण काही भागांमध्ये दारुची दुकाने, पान-बिडीची दुकाने आजपासून (४ मे) सुरु करण्यात आली आहेत. दिल्लीतही गेले ४० दिवस बंद असलेल्या दारुच्या दुकानांसमोर तळीरामांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. पण, जरी ही दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी काही नियमांचे पालन हे विक्रेत्यांना आणि ग्राहकांना पाळावे लागणार आहे. ही दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३० या वेळातच सुरु राहणार आहेत.

दिल्लीमध्ये एकूण १५० दारुची दुकाने आहेत. ग्राहकांनी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, ५ पेक्षा जास्त लोकांनी दुकानाबाहेर एकत्रित गर्दी करण्यास मनाई केली आहे. तसेच, रस्त्यावर पान, गुटखा खाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मॉल, बाजारातील दारुच्या दुकानांना परवानगी देण्यात आली नाही आहे. आणि ज्यांच्याकडे L6 आणि L8 हे परवाने आहेत त्यांनाच दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. दिल्लीत सगळ्यात जास्त महसूल हा मद्यविक्रीतून येतो. वर्षाला ५ हजार कोटी रुपयांचा महसूल हा मद्यविक्रीतून गोळा केला जातो. तसेच, ३ मेपर्यंत मद्यविक्री बंद असल्याकारणाने ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना कोरोनाची लागण…

Arati More

दिल्लीत ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह ८ रूग्णांचा मृत्यू

News Desk

मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट  – मुख्यमंत्री

News Desk