HW News Marathi
महाराष्ट्र

पाऊस आला धावून, पैसा गेला वाहून

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार कोसळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजापेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे अवमुल्य याचा परिणाम शेअर बाजारवर पडलेला दिसून येत आहे. शेअर बाजाराच्या पडझडीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून शेअर बाजाराच्या गंभीर अवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे.

काय आहे सामनाचे आजचे संपादकीय

शेअर बाजारापासून किरकोळ बाजारापर्यंत सध्या हेच सुरू आहे. त्यामुळे शेअर बाजारात पडझड आणि दुष्काळ, महागाईमुळे सामान्य जनतेची तडफड असेच एकंदरीत देशातील वातावरण आहे. गुंतवणूकदारांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांचा खिसा आणि बँक खाते मात्र रिकामे होत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक असो की खिशातील उरलासुरला पैसा, महागाईच्या महापुरात वाहून जात आहे. ‘पाऊस आला धावून, पैसा गेला वाहून’ असे आपल्याकडे म्हटले जाते. पण ना १५ लाख धावून आले, ना पाऊस धावून आला. उलट खिशातील पैसे मात्र वाहून गेले अशी भयंकर अवस्था देशात सामान्य माणसाची झाली आहे.

सध्या देशात शेअर बाजारापासून किरकोळ बाजारापर्यंत सगळी पडझडच सुरू आहे. शेअर बाजारामध्ये काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबण्याची चिन्हे नाहीत. गुरुवारी व्यवहारांच्या सुरुवातीलाच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एक हजार अंशांनी खाली आला. राष्ट्रीय निर्देशांक असलेल्या ‘निफ्टी’मध्येही यापेक्षा वेगळे घडले नाही. निफ्टी 311 अंकांनी घसरला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे चार लाख कोटी रुपये अवघ्या पाच मिनिटांत वाहून गेले. मागील 15-20 दिवसांत असे कोटय़वधी रुपये शेअर बाजारात येणाऱ्या सुनामीत ‘बुडण्या’ची वेळ गुंतवणूकदारांवर सतत येत आहे. त्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाने गटांगळय़ा खाण्याचे सत्रदेखील सुरूच आहे. गुरुवारी एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 74.74 रुपयांपर्यंत घसरले. म्हणजे परकीय चलनाच्या बाबतीतही ना पडझड थांबली आहे ना परकीय गंगाजळीतून रुपयाचे वाहून जाणे. शेअर बाजारातील व्यवहारांचा गरीब माणसाशी काय संबंध किंवा तेथील कोटय़वधींच्या पडझडीमुळे सामान्य जनतेवर काय परिणाम होणार असे प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. त्यात काही प्रमाणात तथ्य असले आणि शेअर बाजार म्हणजे सटोडियांचे व्यवहार हे वादासाठी मान्य केले तरी त्या बाजारातील चढ-उतार शेवटी देशाच्या अर्थव्यवस्थेशीच निगडित असतात.

शेअर बाजार कोसळल्याने

पाच मिनिटांत ज्यांचे चार लाख कोटी रुपये बुडाले त्यात सामान्य गुंतवणूकदारही आहेतच. त्यांच्या खिशातून हा पैसा गेला असे नसले तरी त्यांच्या खिशात पडू शकणारा पैसा वाहून गेला आहे. शेअर बाजारापासून किरकोळ बाजारापर्यंत सध्या हेच सुरू आहे. त्यामुळे शेअर बाजारात पडझड आणि दुष्काळ, महागाईमुळे सामान्य जनतेची तडफड असेच एकंदरीत देशातील वातावरण आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीचा केंद्र आणि राज्य सरकारांचा दिलासाही तात्पुरताच ठरला आहे. कारण त्यानंतरही इंधन दरवाढीचे ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरूच आहे. पेट्रोल-डिझेलचे रोजचे काही पैशांनी महाग होणे थांबलेले नाही. सरकारच्या चार-पाच रुपयांच्या दरकपातीमुळे सामान्यजनांच्या खिशाला लागलेली गळती काही प्रमाणात तरी थांबेल ही अपेक्षा होती, पण ती फोल ठरली आहे. सरकारच्या आटोक्यात ना इंधन दरवाढ आली आहे ना महागाई. त्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. आणि ऑक्टोबर हीटचा तडाखाही कधी नव्हे तो जोरात बसतो आहे. त्याचा परिणाम भाजीपाला, फळफळावळ यांची आवक घटण्यात झाला आहे. साहजिकच त्यांचे भावही कडाडले आहेत. पुन्हा परिस्थिती एवढी गंभीर असूनही ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये महागाईचा दर खाली आला असा सरकारचा दावा आहे. सरकारने कागदोपत्री हा

स्वस्ताईचा आकडा

लावला असला तरी प्रत्यक्षात सामान्य माणसाला मात्र सर्वच दरवाढीने ‘आकडी’ येण्याची वेळ आली आहे. पुन्हा मल्ल्यापासून नीरव मोदीपर्यंत अनेक कर्जबुडव्यांमुळेही देशाचे एखाद लाख कोटी वाहून गेलेच आहेत. बँकांच्या तिजोरीतील हा पैसा परत आणण्याच्या गोष्टी सरकार करीत असले, कर्जबुडव्यांच्या मालमत्ता जप्त वगैरे करण्याची कारवाई सुरू असली तरी हा सगळा प्रकार दर्या में खसखस असाच आहे. थकबाकीदार उद्योगपती असोत की स्वीस बँकेचे काळा पैशाचे खातेदार असोत, सगळा पैसा देशातील सामान्य जनतेचाच आहे. जनतेने तो कर म्हणून सरकारच्या तिजोरीत भरला होता. मात्र तो थेट कर्जबुडव्या उद्योगपतींच्या खिशात आणि स्वीस बँकेच्या खात्यांत पोहोचला. परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दिले होते. हे 15 लाख तर काही आजपर्यंत जमा झालेले नाहीत, पण गुंतवणूकदारांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांचा खिसा आणि बँक खाते मात्र रिकामे होत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक असो की खिशातील उरलासुरला पैसा, महागाईच्या महापुरात वाहून जात आहे. ‘पाऊस आला धावून, पैसा गेला वाहून’ असे आपल्याकडे म्हटले जाते. पण ना 15 लाख धावून आले, ना पाऊस धावून आला. उलट खिशातील पैसे मात्र वाहून गेले अशी भयंकर अवस्था देशात सामान्य माणसाची झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विलासरावांच्या शेजारी उभारले जाणार गोपीनाथ मुंडेंचे पूर्णाकृती स्मारक

News Desk

देख लिया “७० साल मे कुछ नही हुआ.. देख लिया… !

News Desk

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडूनही श्रद्धांजली

News Desk