HW News Marathi
महाराष्ट्र

उर्मिला मातोंडकरांचे नाव मीडियात चर्चेत आहे आम्हाला याची काही कल्पना नाही –  अनिल परब

मुंबई | शिवसेनेकडून विधानपरिषदेवर उर्मिला मातोंडकर हिचे नाव जाणार अशा चर्चा सुरु आहेत. यावर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिले आहे. उर्मिला मातोंडकर हे नाव मीडियात चर्चेत आहे, आम्हाला त्याबाबत कल्पना नाही, असं अनिल परब म्हणाले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या उमेदवारीबाबत त्यांना विचारले असता ते बोलत होते.

कोणताही निर्णय घेताना पक्षाचा प्रमुख हा सारासार गोष्टींचा विचार करून निर्णय घेतो. त्याचे कारण असे आहे की, त्या कॅटेगरीत बसणारे कार्यकर्ते कोण आहेत? लोक कोण आहेत? हे कसे बसवायचे, याचा निर्णय प्रत्येक पक्षाचे पक्षप्रमुख घेत असतात, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. शिवसैनिक किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांचा हा विषय नाही. तो त्या पक्षप्रमुखाचा विषय आहे की, त्याला कॅटेगरीत बसवायचे आहे. त्याची कॅटेगरी कशी बसवायची, त्याचे निकष काय असतील हे कुणाला बसवायचे हा अधिकार पक्षाला असतो आणि तो निर्णय त्या पक्षाचा पक्षप्रमुख घेतात, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि कोर्टातही टिकवलं मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही –  शिवेंद्रराजे भोसले  

News Desk

‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

ईडी पान-तंबाखूचं दुकान झालंय…भाजपविरोधात बोलल्याने उद्या माझ्याही घरी ईडी येऊ शकते

News Desk