HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जत पंचायत निवडणुकीवरून पवार आणि शिंदे पुन्हा आमने-सामने!

अहमदनगर। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी दोन दिग्गज नेत्यांमध्ये आता जुंपलेली पहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार म्हणून ओळख असलेले रोहित पवार तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे अशी लढत होणार आहे. 21 डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. कर्जत नगरपंचायतीवर सध्या भाजपची एक हाती सत्ता आहे. ही सत्ता राखण्यासाठी शिंदेंनी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर रोहित पवार यांनी भाजपचा गड राखण्यासाठी आता जोरदार तयारीला सुरुवात केलेली पहायला मिळते.

राजकारण करणाऱ्या लोकांच्या मागे लोक कधीही उभे राहत नाहीत

गेल्या पंचवार्षिक ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा मोठा पराभव करुन भाजपला धक्का देत दारुण पराभव केला होता. मात्र, आता रोहित पवारांची खरी कसोटी नगरपंचायतीच्या निवडणुकीत लागणार आहे. रोहित पवारांसाठी ही निवडणूक महत्वाची असेल. तर शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते सर्व ताकद लावून कामाला लागले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत विजय आमचाच होणार, नगर पंचायतीच्या 17 पैकी 17 जागा आम्हीच जिंकणार, असा दावा रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच राजकिय हित आणि राजकारण करणाऱ्या लोकांच्या मागे लोक कधीही उभे राहत नाहीत, अशी टीका करत राम शिंदेंवर निशाणा साधला आहे.

जनता भाजपला बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही

एकीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदेंवर टीका करत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे राम शिंदे हे मागील 10 वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते. तसेच भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. या काळात मतदारसंघात मी अनेक विकासाची कामे केली. मात्र, मागील दोन वर्षांपासून कुठलंही काम या मतदारसंघात झालं नाही, अशी टीका शिंदे यांनी रोहित पवारांवर केलीय. तसेच आपण केलेल्या कामाच्या जोरावर आणि लोकांच्या विश्वासावर जनता भाजपला बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य राम शिंदे यांच्याकडून करण्यात आले निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर लगेचच एकमेकांवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांची ‘जय श्री राम’च्या घोषणेने नव्या कामाची सुरुवात

News Desk

विधानपरिषद उपसभापतींसह मंत्र्यांची पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात बैठक

Aprna

भाजप शासीत राज्यांमधील महिला व दलित अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार!

News Desk