HW News Marathi
महाराष्ट्र

पवार कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत !

कोल्हापूर | “आयकर किंवा ईडीचे छापे काय ८ दिवसांत टाकता येत नाहीत. त्यासाठी त्या यंत्रणा त्या प्रकरणाचा ६ महिन्यांहूनही अधिक काळ अभ्यास करतात. शरद पवार, हसन मुश्रीफ कांगावा करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे आरोप भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते आज (२८ जुलै) कोल्हापूर येथे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर, पक्षांतराच्या मुद्द्यावर भाष्य केले. दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी केलेल्या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याची विचारणा करण्यात आली होती. मात्र, मुश्रीफ यांनी नकार दिल्याने त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे”, असा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्याचप्रमाणे, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात आहे”, असे देखील शरद पवार म्हणले. त्यावर, “जे आमच्या पक्षात येत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची भीती दाखवण्याची आम्हाला गरज नाही. ते सर्वजण स्वखुशीने भाजपमध्ये येत आहेत”, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Aprna

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

News Desk

“पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नावं द्या”, संभाजी ब्रिगेडची मागणी

News Desk