HW News Marathi
महाराष्ट्र

केरळमधील नागरीकांना पुण्यातून जाणार पिण्याचे पाणी

पुणे | केरळमध्ये ८ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पावसामुळे महापूरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या या पुरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून शनिवारी सात लाख लिटर पाणी रेल्वेने केरळला पाठवले जाणार आहे. तसेच रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी केरळला रवाना केले जाणार आहे.

रतलाम येथूनही १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे २९ वॅगन दुपारी १ वाजता पुण्यात दाखल झाल्यानंतर एकूण ४३ वॅगनमध्ये २१ लाख ५० हजार लिटर पाणी घेऊन ही विशेष रेल्वे दुपारी २ वाजता केरळकडे रवाना होईल. केरळ मधील कयनकुलम जंक्शनवर हे पाणी पोहचवले जाईल. पुण्यातील रेल्वे च्या अधिकारी व कर्मचा-यांकडून काल रात्रीपासून यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वैद्यनाथ साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झाले नाही, हा केवळ राजकीय खोडसाळपणा

News Desk

काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक सुरू, सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा होणार

News Desk

महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे एकजुटीचे शक्तीप्रदर्शन

News Desk
महाराष्ट्र

भाजप लाचार नाही, ‘होय’ युती आम्हाला हवी आहे !

News Desk

जालना | भाजप लाचार नाही. होय युती आम्हाला हवी आहे, पण हिंदूत्व एकत्र राहावे म्हणून, भ्रष्टाचाराविरुद्धच्या शक्ती एकत्र रहाव्या म्हणून. जो हिंदूविरोधी असेल, तो सोबत येणार नाही, बाकी सारे सोबत असतील.”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालनातील महाराष्ट्र भाजप कार्यसमितीच्या सभे असे बोलत होते. तसेच मुख्यमंत्री असे देखील म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप यांच्यासाठी महत्वाची नव्हे, तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे.

“मोदीं विरोधात सर्वजण एकत्र येत आहेत. जे लोक कालपर्यंत ऐकमेकांचे तोंड देखील पाहत नव्हते, तेच आता एकत्र आले आहेत. या सर्वांना मोदींची भिती वाटत. त्यामुळे ते एकत्र आल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली. कोलकत्तामध्ये नुकतेच २२ पक्ष मोदी विरोधात एकत्र आले होते. त्या २२ पक्षांना मुख्यमंत्र्यांनी ‘खिचडी’ असे संबोधून त्या सर्वांना टोला हाणला. मुख्यमंत्र्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या २२ पक्षांची महारॅलीवर सूचक शब्दात हल्लाबोल केला आहे.”

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • पालिका निडणुकीत तीन ठिकाणी भाजपचा विजय
  • पुढील कार्यकारणी बैठक लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर
  • निवडणुकीआधी लोकांना नेता ठरविता येत नाही.
  • खोटा बोला पण रेटून बोला हे विरोधकांचे धोरण

  • फेब्रुवारीपर्यंत दुष्काळग्रस्तांना सरकारी मदत मिळणार
  • सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळेपर्यंत कर्ज माफी योजना सुरू राहणार
  • एकमेकांची तोडे न बघणारी आज भाजप विरोधात एकत्र
  • ६० वर्षांचे खड्डे एकतम पाच वर्षात मिटविता येत नाही

  • काँग्रेसने केलेले खड्डे आम्ही आता भुजवायला सुरुवात केली आहे
  • विरोधकांचे फक्त मोदी हटाव हे धोरण आहे
  • विरोधकांना आपले अस्तिव नष्ट होण्याची भिती वाटते.
  • राज्यातील जनता मात्र भाजपच्या पाठिशी
  • भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष
  • देशात गरिबांच्या नावाने राजकारण केले गेले
  • भाजप सरकराने गरिबांना योजना पुरविल्या
  • आगामी निवडणूक ही एका नव्या पर्वाची निवडणूक असणार आहे
  • युतीसाठी आम्ही कोणापुढे लाचार नाही, असे म्हणत शिवसेनेवर टीका केली.
  • हिंदूत्वाला मानणारे आमच्या सोबत येतीलच
  • युतीची काळजी करू नका

 

 

Related posts

पंतप्रधान उद्या पुण्याला भेट देणार; पुणे मेट्रो प्रकल्पाचे करणार उद्घाटन

News Desk

हत्तीची चाल, वजिराचा रुबाब म्हणजेच ‘लोकप्रिय नेता’ शरद पवार – सामना

News Desk

तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या १५८ बसचालकांना घरी पाठविले

swarit