HW News Marathi
महाराष्ट्र

पंकज मुंडेंच्या आवाहनाला जनतेने दिली साथ, गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथीला घरातून वाहिली श्रद्धांजली

बीड | लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची ६ वी पुण्यतीथी आज गोपीनाथ गडावर अतिशय सध्या पद्धतीने साजरी करण्यात आली, पंकजा मुंडे यांनी फेसबुक वर पोस्ट केली होती की गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या तमाम जनतेने आपल्या घरीच राहून श्रद्धांजली अर्पण करायची तसेच गोपीनाथ गडावर लोकीही यायचे नाही या आव्हानाला जनतेने चांगलाच प्रतिसाद दिल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 

पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे यांचा फोटो ट्वीट करत पुण्यस्मरण….असे लिहिले आहे. एक कविता फोटो ट्वीट केला आहे. “मुझकों, पढ पाना हर किसी लिए मुमकिन नहीं…मैं वो किताब हूँ जिसमे, शब्दों की जगह जज्बात लिखे हैं…!” आज गोपीनाथ गडावर फक्त खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी मोजक्या कार्यकर्त्या सह येऊन श्रद्धांजली अर्पण केली. मात्र या कार्यक्रमात घरातील इतर कोणताही सदस्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या अधीन राहून तसेच पंकजा मुंडे यांचा शब्दाला मान देत गोपीनाथ गडावर आले नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले

Aprna

“आबा आज तुम्ही गृहमंत्री म्हणून हवे होता…!”

News Desk

‘हे’ सरकार पाडण्यासाठी बाहेरुन कोणतेही प्रयत्न करण्याची गरजच नाही !

News Desk