HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे होते – जे.पी.नड्डा

मुंबई | काल (८ ऑक्टोबर) भाजपची कार्यकारीणी बैठक पार पडली. यावेळी अनेक विषयांवर नेत्यांनी भाष्य केले. यावळी महाविकास आघाडी सरकार कसे अकार्यक्षम आहे हे दाखवण्यात आले. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार कोण चालवत आहे, कुठून चालत आहे हे काहीही कळत नाही. हे सरकार घरी पाठविण्यासाठी निशाणा साधण्याची वेळ आली असून सत्तेतील सध्याचे तिन्ही पक्ष विरोधी पक्षात दिसतील आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असे भाकित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी वर्तवले आहे.

महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. नड्डा म्हणाले की, राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे होते, त्यांनी तसा कौलही दिला होता. पण राजकारणात कधी कधी धोका होतो. तो धोका राज्यातील जनतेसोबत झाला. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या सत्तेत असलेले तिन्ही पक्ष येणाऱ्या काळात तुम्हाला नेहमीसाठी विरोधी पक्षात दिसतील, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीने शेतकरी कायद्यांना केलेल्या विरोधाबद्दलही नड्डा यांनी भाष्य केले. शरद पवारांनी आधी शेतकरी कायद्याचे समर्थन केले तर ते चांगले आणि मोदींनी ते मंजूर केले तर मोदी देशद्रोही कसे? काँग्रेसने आधी कायद्यांचे सूतोवाच केले आणि आता मोदींनी कायदे केल्यानंतर तेच आज ट्रॅक्टर जाळून निषेध करत आहेत. हा सरळसरळ बेगडीपणा आहे, असेही नड्डा म्हणाले. महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरुद्ध राज्यभर निदर्शने राज्यात महिला अत्याचार, बलात्काराच्या वाढत्या घटनांविरुद्ध आवाज उठविण्यासाठी १२ ऑक्टोबरला भाजपच्या वतीने राज्यात ७०० ठिकाणी निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत शिवाजी पार्क ते चैत्यभूमी असा लाँगमार्च निघणार आहे. केंद्राच्या शेतकरी कायद्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Exclusive Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंना हळूहळू कळेल, ‘हे’ लोक कसे फसवितात ते !

swarit

मंत्रिपद न मिळालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची नाराजी पुन्हा उघड, जयंत पाटलांच्या दौऱ्यात अनुपस्थिती!

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘त्या’ प्रकरणी CBI चौकशी करा, भाजपच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

News Desk