HW News Marathi
महाराष्ट्र

संपावर तोडगा म्हणून एसटी डेपो जवळून खाजगी वाहनाना सेवा देण्यास परवानगी

मुंबई सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. या मुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहेत. या वर तोडगा म्हणून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाने खाजगी बसेस ना एसटी डेपो जवळून सेवा देण्याची तात्पुरती परवानगी दिली आहे.

एसटी कर्मचारी संघटनांनी सोमवारी मध्यरात्री पासून बेमुदत संपला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातल्या अनेक भागात एसटीची वाहतूक विस्कळीत झाली आहे. एसटी कर्मचारी संघटनांनी ताठर भूमिका घेतल्याने अनेक डेपोतून एकही गाडी सुटली नसल्याचा दावा एसटी कर्मचारी संघटनेचे हनुमंत ताटे यांनी महा बातमी शी बोलताना केला .या संपात शिवसेनेची कामगार संघटना सहभागी नाही. याला पर्यायी व्यवस्था म्हणून सरकारने खाजगी गाड्या, शाळेच्या बस आणि खाजगी बस वाहतुकीला ही तात्पुरती परवानगी दिल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या कामगार संघटनांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून लवकरच पुन्हा बैठक बोलवली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय शिक्षण संकुलासाठी जागेची प्रधान सचिव देवरा यांच्याकडून पाहणी

News Desk

कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल! – जितेंद्र आव्हाड

Aprna

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांचा पुढाकार; देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित विजेचा प्रयत्न

News Desk