HW News Marathi
महाराष्ट्र

Unlock 1.0 | पेट्रोल कंपन्यांची दरवाढ सुरूच

मुंबई | कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. अनेक नियम या लॉकडाऊनमध्ये शिथिल करण्यात आले. लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे.

रविवारी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैशांची वाढ झाला होती. त्यांतर आज पुन्हा एकदा दरवाढ करून पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे.

आज ( ९ जून) पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५८ पैशांची तर डिझेलच्या दरात ५४ पैशांची वाढ केली. यानंतर मुंबईतील पेट्रोलचा दर ८०.०१ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ६९.९२ रुपये प्रति लीटर झाला. तर दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर वाढून ७३ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ७१.१७ रुपये प्रति लीटर इतका झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुकाराम मुंढे देतायत शिस्तीचे धडे

swarit

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत तसंच बहुजन युवकांचं पालकत्व स्वीकारा !

News Desk

नवाब मलिकांचा भाऊ कप्तान मलिकांना ED ने बजावला समन्स

Aprna