HW News Marathi
महाराष्ट्र

‘RTO’ हप्तेखोरीचा आरोप राज्य सरकारच्या बदनामीसाठी – छगन भुजबळ

नाशिक | महाविकासआघाडीतील एक एख मंत्र्यांवर संकट येताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हप्तेखोरीचा केलेला आरोप आणि त्या अनुषंगाने केलेली तक्रार हे सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचा दावा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. प्रादेशिक परिवहन विभागात मोठी हप्तेखोरी चालत असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापर्यत लागेबांधे असल्याची तक्रार या विभागातील एका आधिकाऱ्याने पोलिसांकडे केली आहे. त्यावर भुजबळ बोलत होते.

ते म्हणाले की, नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात त्यांच्या परिवहन विभागात कोट्यवधीचा भष्ट्राचार हप्तखोरी चालत असल्याचा आरोप करत, तशी तक्रार केली आहे. पंचवटी पोलिसांकडे केलेल्या ई मेलसह तक्रारीत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याही नावाचा उल्लेख असल्याने त्याविषयी भुजबळ यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हा सरकारला बदनामीचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

परिवहन विभागात बदल्यासाठी मोठ्या प्रमाणात हप्तखोरी चालते. प्रादेशिक परिवहन विभागाच्या राज्यभरातील विविध कार्यालयांतील अधिकारी चेकपोस्ट, बदल्यांसाठी अधिकारी महिन्याला लाखो रुपये वसूल करून वरपर्यंत पाठवितात. हा आकडा १५० कोटींपर्यंत असून, त्यात परिवहनमंत्री अनिल परब, राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, उपपरिवहन आयुक्त जितेंद्र कदम, उपसचिव प्रकाश साबळे, परिवहन विभागाचे अवर सचिव डी. एच. कदम, वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आदीसह अनेकांचे नावांचा उल्लेख करीत पंचवटी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. याविषयी नाशिकचे पालकमंत्री असलेल्या भुजबळ यांन विचारले असता त्यांनी हा विषय सरकार बदनाम करण्यासाठी असल्याचे म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं स्वतःचं भाग्य समजतो – प्रविण दरेकर

News Desk

राणा दाम्पत्य आज ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करणार?

Aprna

राजकीय दंगलीमुळे देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होईल!, राऊतांचे भाकीत

Aprna