HW News Marathi
देश / विदेश

देशभरात इंधनांचे दर आज स्थिर, पेट्रोल शंभरीपार, तर डिझेल शंभरी गाठण्याच्या तयारीत

नवी दिल्ली | देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरु असतानाच आज (10 जुलै) काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज इंधन दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. एका दिवसापूर्वी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 35 पैसे आणि 26 पैसे प्रिती लिटर वाढ करण्यात आली होती. त्यानंतर राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा भाव 100.91 रुपये आणि डिझेलचा भाव 89.88 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं होतं.

डिझेलची किंमत संपूर्ण देशात शतक पार करण्याच्या तयारीत आहे. मुंबईत 29 मे रोजी पेट्रोलचे दर पहिल्यांदाच शंभरीपार पोहोचली आहे. शनिवारी पेट्रोलची किंमत 106.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. शहरात डिझेलची किंमत वाढून 97.44 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :

मुंबईमध्ये आज पेट्रोल 106.92 रुपये आणि डिझेल 97.46 रुपये प्रति लिटर

चेन्नईत आज पेट्रोल 101.67 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर

कोलकातात आज पेट्रोल 101.01 रुपये आणि डिझेल 92.97 रुपये प्रति लिटर

बंगळुरुमध्ये आज पेट्रोल 104.29 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लिटर

चंदीगडमध्ये आज पेट्रोल 97.04 रुपये आणि डिझेल 89.51 रुपये प्रति लिटर

लखनौमध्ये आज पेट्रोल 98.01 रुपये आणि डिझेल 90.27 रुपये प्रति लिटर

रांचीत आज पेट्रोल 95.96 रुपये आणि डिझेल 94.84 रुपये प्रति लिटर

पाटनात आज पेट्रोल 103.18 रुपये आणि डिझेल 95.46 रुपये प्रति लिटर

भोपाळमध्ये आज पेट्रोल 109.24 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लिटर

वैश्विक स्तरावर कच्च्या तेलाची किंमत आता 75 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये ही 80 रुपये प्रति बॅरलहून अधिक होती. परंतु, तरिही देशात पेट्रोलची किंमत जवळपास 80 रुपये प्रति लिटरच्या आसपास होती. परंतु, आता तेलाची किंमत कमी असूनही पेट्रोलची किंमत शंभरीपार पोहोचली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चहा, नाष्टा देत नाही म्हणून पत्नीला तलाक

News Desk

#PulwamaAttack : जाणून घ्या… ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ म्हणजे काय ?

News Desk

दिल्ली उच्च न्यायालयाला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी 

News Desk