नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्ण संख्या एकीकडे वाढत असताना लसीकरण देखील मोठ्या प्रमाणासह सुरु आहे. या कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण १ मेपासून सुरू होणार आहे.आता १८ वर्षांवरील सगळ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. १ मेपासून सगळ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्राकडे महाराष्ट्रात २५ वर्षांवरील सगळ्यांना कोरोना लस देण्याची विनंती केली होती.
Govt of India announces liberalised & accelerated Phase 3 strategy of COVID-19 vaccination from May 1; everyone above the age of 18 to be eligible to get vaccine pic.twitter.com/7G3WbgTDy8
— ANI (@ANI) April 19, 2021
आत्तापर्यंत देशात ६० वर्षांवरील लोकांना, ४५ वर्षावरील सगळ्यांना कोरोना लस दिली जात होती. मात्र, आता १८ वर्षावरील सगळ्यांनाच लस देणार असल्याने लवकरात लवकर सगळ्यांना लसीकरण पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे. मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस उत्सव सुरु केला होता. याचा लाभली अनेकांना घेतला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.