HW News Marathi
महाराष्ट्र

छायाचित्रकार हा पोलिसांचा तिसरा डोळा – पो. नि. पडवळ 

नांदेड – छायाचित्रकार व त्यांनी टिपलेले छायाचित्रे हे वृत्तपत्रांसह पोलीस यंत्रणेसाठी उपयुक्त ठरतात. छायाचित्रकार हा पोलिसांचा तिसरा डोळाच हे, असे कौतुकोद्गार पो. नि. आर. एस. पडवळ यांनी भोकर येथे काढले. फोटोग्राफर्स मल्टीपर्पज असोशिएशन आयोजित जागतिक छायाचित्र दिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

शासकीय विश्रामगृह भोकर येथे १९ ऑगस्ट रोजी तालुका कृषि अधिकारी आर. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व पडवळ, काँग्रेस ता. अध्यक्ष सभापती जगदिश पाटील, रा.काँ.पार्टी जिल्हा संघटक जवाजोद्दीन बरबडेकर, जि.प.सदस्य बाळासाहेब पा.रावणगावकर,शिवसेना ता.प्र.सतिश देशमुख,भाजपा ता.अ.गणपत पिट्टेवाड,नगर सेवक तथा आर्य वैश्य समाज संघटना ता.अ.सुवेश पोकलवार,बाबूराव दंडवे, सामाजिक कार्यकर्ते युसूफ भाई,बाजार समिती संचालक गणेश पाटील कापसे,कृ.बा.सं.रामचंद्र मुसळे, सरपंच संघटना ता.अ.सुनिल चव्हाण,पांडूरंग पा.हस्सापूरकर,नगर सेविका विजयाताई घुमनवाड,रमेश घुमनवाड, माऊली चिंचाळकर,सहा.पो.नि.सुरेश भाले,पत्रकार बाबूराव पाटील,राजेश वाघमारे,मनोजसिंह चाैहान,अरुण डोईफोडे,शंकर कदम,जयभिम पाटील,रमेश गंगासागरे,अरुण डोईफोडे, सिद्धार्थ जाधव आदीच्या प्रमुख उपस्थितीत फोटोग्राफर्स मल्टीपर्पज असोशिएशन भोकर या नोंदणीकृत संघटनेच्या वतीने ” जागतिक छायाचित्र दिन ” साजरा करण्यात आला.

या वेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या. ‘४ जी इंटरनेट व सोशल मिडियाचे दिवस आले असले, तरी छायाचित्रकारांनी काढलेले छायाचित्र हे सामान्य नागरिकांना जेवढे आवश्यक आहेत, तेवढेच पोलीस खात्यासही महत्वाची आहेत. कारण ते अपप्रवृत्ती टिपतात व प्रसंगी तपास यंत्रणेस उपयुक्त ठरतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ओबीसींचा प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा, सत्तेत येण्याची गरज नाही’ – जयंत पाटील

News Desk

नव्या गृहमंत्र्यांकडून पोलीस दलाच्या ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न ! फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना लांब ठेवणार ? 

News Desk

रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित

News Desk