HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ व्हिडीओवर महाराष्ट्र भाजपने दिले स्पष्टीकरण

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ या हिंदी सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच उदयभान राठोडची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानच्या जागी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (२१ जानेवारी) पत्रकार परिषदेत दिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी अक्षेापार्ह घेतल्यानंतर पोलिटिकल कीडाने तो व्हिडीओ डिलिट केला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर भाजप महाराष्ट्राने स्पष्टीकरण देत ट्विट केले आहे आहे. भाजप महाराष्ट्राच्या ट्विटमध्ये म्हटले की, “पॉलिटिकल कीडा या कुठल्याशा ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या व्हीडिओचा भाजपाशी कुठलाही संबंध नाही. तो भाजपाचा अधिकृत व्हीडिओ नाही. तो कुठेही प्रचारात वापरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कुणाचीही तुलना करण्याचे भाजपा कधीही समर्थन करणार नाही.” “पुस्तक झाले आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी,” असे ट्वीट कर खासदार संभाजी राजे यांनी भाजपला घराचा आहेर दिला आहे.

दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका ७० सदस्यसंख्या असून मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्येच प्रमुख पाहायला मिळत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारुड्यांचा हल्ल्यात जखमी झालेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णींची चौकशी केल्याबद्दल सर्वांचे मानले आभार

News Desk

क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिस रकमेत पाचपट वाढ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी केली पराग शहांच्या गाडीची तोडफोड

News Desk