HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

‘या’ कारणामुळे पियुष गोयल चिडले मुख्यमंत्र्यांवर

मुंबई | महाराष्ट्रासाठी रोज १२५ ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वे मंत्रलायकडे स्थलांतरित मंजुरांची यादी द्या, अशी मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी  आज (२४ मे) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाध साधला. यावेळ मुख्यमंत्री म्हणाले, “राज्याची रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी असताना केवळ ३० ते ४० ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत,” असा रेल्वेमंत्र्यांवर आरोप केला. यानंतर गोयल यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या आरोपला प्रतिउत्तर दिले.

गोयल ट्वीटमध्ये म्हणाले, उद्धवजी आशा आहे तुम्ही स्वस्थ असाल. तुमच्या स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्राला उद्यापासून रोज १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. तुमच्या मजुरांची यादी तयार आहे, असे तुम्ही सांगितले. तसेच तुम्ही स्थलांतरित मंजुरांची ही यादी कृपया रेल्वे मंत्रालयाकडे पाठवावी. त्याचबरोबर ट्रेन कुठून सोडायची आहे. ट्रेट्रेन स्टेशनवर आल्यावर त्या आधीसारख्या रिकाम्या जाणार नाहीत अशी अपेक्षा आहे. तुम्हा जितक्या ट्रेन हव्या आहेत तेवढ्या उपलब्ध करून दिल्या जातील,” असे गोयल यांनी स्पष्ट केले.

सरकारने २०० ट्रेनसाठी मजुरांची यादी रेल्वेकडे दिल्याचा दावा केला आहे. पण मध्य रेल्वेने सतत पाठपुरावा करूनही महाराष्ट्र सरकारकडून कालपर्यंत एकही यादी रेल्वेच्या मंत्रालयाकडे आलेली नाही. कृपया यादी लवकरात लवकर पाठवण्याची कृपा करावी, असे आवाहन ही रेल्वेमंत्रींनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Related posts

आजपासून राज्यपाल नागपूर मुक्कामी, मुंबई परतीचा उल्लेख नाही 

News Desk

अरुण जेटली यांची प्रकृती अजूनही गंभीर

News Desk

गेल्या २४ तासात ६ हजार ५३५ रुग्णांची नोंद, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४५ हजार ३८० रुग्ण

News Desk