पुणे | इंदापूर तालुक्यात रुई येथे ग्लेडर हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान कोसळले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुर्घटनेत शिकाऊ पायलट जखमी झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली असून विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे विमान अक्कलकोट वरून बारामतीला निघाले होते. सिद्धार्थ टायटस असे जखमी पालयटचे नाव आहे.
Maharashtra: A trainee aircraft of Carver aviation (pilot training institute) has crashed near Indapur, Pune. The trainee pilot, who is injured, has been rushed to a hospital in Baramati. More details awaited. pic.twitter.com/1fvIp96Fbm
— ANI (@ANI) February 5, 2019
वैमानिक टायटस सकाळी १० वाजता अक्कलकोट येथून विमान घेऊन बारामतीला निघाले होते. दुपारी १२ वाजून ५ मिनीटांनी विमान बाबीर विद्यालयाच्या मागील बाजूस इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ३५०० फूट उंचीवरून खाली कोसळले. या अपघातात जखमी झालेले पायलट टायटस यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बारामती इथे हलविण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.