HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेकडून सीरियावर हवाई हल्ला

वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटेनने या दोन्ही देशांनी पाठिंबा दिला आहे. अमेरिकांन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीरियाच्या विरूद्ध कारवाई करण्यासाठी लढाऊ विमानांचा वापर केला जातो आहे. तसेच हल्ल्यासाठी बॉम्बचाही वापर होतो आहे. तर दुसरीकडे, रशियानेही अमेरिकेला मिसाइल हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे.

‘सीरियाचा हुकूमशाह बशर अल असद यांच्या रासायनिक हल्ल्याचा लक्ष्य बनवून हल्ले सुरु करावेत, असे आदेश काहीच वेळापूर्वी आम्ही सैन्याला दिले आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सीरिया प्रकरणावरुन देशाला संबोधित करताना म्हटले.

‘फ्रान्स आणि ब्रिटनच्या मदतीने यासंदर्भात एक संयुक्त ऑपरेशन सीरियात सुरु आहे. यासाठी दोन्ही देशांचे मी आभार मानतो. हा हल्ला असद सरकारला सीरियामध्ये रशियाच्या रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापरास रोखण्यात अपयशी ठरल्याचा परिणाम आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, सीरियातील डुमामध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यात लहान मुलांसह एकूण 74 जणांचा मृत्यू झाला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा ‘होमटाऊन’ दौरा; असा आहे कार्यक्रम

Darrell Miranda

मला निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहे !

News Desk

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna