HW News Marathi
Covid-19

पुण्याच्या ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीला केंद्रकडून मिळाली परवानगी

पुणे | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारने प्लाझ्मा थेरपीला परवानगी दिली आहे. राज्यात पुण्यातील ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार आहे. यामुळे आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आता नवा आशेचा किरण दिसून आला आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांवर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाला नवी दिल्ली येथील सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रल ऑर्गनायजेशने (सीडीएससीओ) काल (२५ एप्रिल) मान्यता दिली आहे. पुण्यात कोरोनाबाधितांवर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यांचा हा प्रस्ताव केंद्राने मान्य केला आहे. प्लाझ्मा थेरपीसाठी अत्यावश्यक उपकरणे देखील आण्यात आली होती.

महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ८ हजार ९७२ चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी १ लाख १ हजार १६२ लोकांचे कोरोना नमुने निगेटिव्ह आले. ३२३ जणांचा दुर्देवाने मृत्यू झाला. राज्यात प्लाझ्मा थेरपीला परवानगी मिळाल्याचे ते म्हणाले, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचा हा पुणे दौरा म्हणजे फक्त दिखावा !

News Desk

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच !

News Desk

आता १० अंकांचा मोबाइल ११ अंकी करण्याच्या ट्रायने दिल्या सूचना

News Desk