HW News Marathi
Covid-19

#Coronavirus : मुंबईत प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू

मुंबई | मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा हा सर्वाधिक आहे. याच आकड्याला आळा घालण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली होती. पण, प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझमा थेरपी प्रयोग प्रथमच शनिवारी लीलावती रुग्णालयातील ५२ वर्षीय रुग्णावर करण्यात आला होता. मात्र दुर्दैवाने या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

२० एप्रिलला ताप, सर्दी आणि फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने ५२ वर्षीय रुग्णाला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. चाचण्यांमध्ये त्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या रुग्णाला व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारकडून आणि महापालिकेकडून परवानगी मिळताचं रुग्णालयाने नायर रुग्णालयात कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी दान केलेले प्लाझ्मा लीलावती रुग्णालयाला देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्या रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, आज अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला गरज कर्तव्यदक्ष नेतृत्वाची, भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

News Desk

‘कोरोना’च्या संकटात संयमाचा ‘बारामती पॅटर्न’ दाखवूया-अजित पवार

Arati More

आईच्या निधनानंतर ३ दिवसातच राजेश टोपे पुन्हा राज्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले

News Desk