नवी दिल्ली। CBSEचा आज(३०जुलै) इयत्ता १२वी बोर्डाचा निकाल लागला आहे. यंदा 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायेस्ट पासिंग परसेंटेज निकाल आहे. तरीही, 6149 (0.47) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. या निकालानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदींनी सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला आहे.
To those who feel they could have worked harder or performed better, I want to say – learn from your experience and hold your head high. A bright and opportunity-filled future awaits you. Each of you is a powerhouse of talent. My best wishes always.
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2021
पंतप्रधानांकडून कौतुक
इयत्ता बारावीत यश मिळालेल्या मुलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला आणि त्यांना मोलाचा सल्ला देखील दिला आहे. नरेंद्र मोदींनी ट्विट करून मुलांचं कौतुक केलं आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा. असे मोदींनी म्हटलं आहे. तसेच, ज्यांना वाटते की त्यांनी अधिक मेहनत घेतली किंवा यापेक्षाही चांगले गुण मिळवले असते त्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या अनुभवातून शिका आणि नेहमी मोठं ध्येय पाहा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेलं भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण प्रतिभेचा उर्जास्थान आहे. माझ्या नेहमीच शुभेच्छा. अशा शब्दात मोदींनी कोरोना कालावधीतील निकालाकडे पाहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिलं आहे.
The Batch which appeared for the Class XII Boards this year did so under unprecedented circumstances.
The education world witnessed many changes through the year gone by. Yet, they adapted to the new normal and gave their best. Proud of them!— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2021
यंदाच्या परीक्षेत मुलींची बाजी
यंदा मुलांना वेगळा पद्धतीने परीक्षा द्यावी लागली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. यंदाच्या परीक्षेतही परत एकदा मुलींनी बाजी मारलेली दिसत आहे. यंदा मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ०.५४% ने जास्त आहे. यंदाच्या परीक्षेत ९९.६७ मुली तर ९९.१३ टक्के मुलं पास झाली. सलग सहाव्या वर्षी मुलींना बाजी मारलेली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.