HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

उद्या पंतप्रधान साधणार देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

मुंबई | संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनाचा हा संसर्ग लवकरात लवकर रोखता यावा यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी देशात एकूण २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. मात्र, लॉकडाऊन असताना संसर्ग वाढतच असताना आता काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी उद्या (२ एप्रिल) देशातील सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांतील एकूण सद्यस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजनांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधानांनी देशात जारी केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन हा १४ एप्रिलला संपणार आहे. देशात त्यादृष्टीने परिस्थितीत कितपत सुधारणा आहे किंवा पुढे कोणकोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत ? याबाबतही सध्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. भारत हा सध्या कोरोनाच्या दुसऱ्या म्हणजेच ‘लोकल ट्रान्समिशन’ स्टेजला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या म्हणजे ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’ स्टेजपर्यंत देश पोहोचू यासाठी सर्वतोपरी उपाय केले जात आहेत. ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’मध्ये संसर्ग कुठून झाला याचे निदान करणे कठीण असल्याने आपण तो संसर्ग थांबवू शकत नाही. म्हणूनच आतच केंद्र-राज्य सरकार मिळून निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी देखील देशातील सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच संवाद साधला होता. त्याचप्रमाणे, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांची देखील राज्यांतील परिस्थितीबद्दल यापूर्वी फोनवर चर्चा झालेली आहे. देशात सध्या राजकरण बाजूला सारून सर्व पक्ष, सर्व सरकारे, सर्व नेतेमंडळी एकजुटीने या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे.

Related posts

AIMIM चे अध्यक्ष ओवेसी यांनी कॉंग्रेसवर केले गंभीर आरोप

News Desk

दोन्ही भोसले आमने-सामने

Gauri Tilekar

पंतप्रधान मोदींनी आपला शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा !

News Desk