नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. दरम्यान, याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज (२७ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बातचीत केली. यात त्यांनी येणाऱ्या काही महिन्यात कोरोनाचा प्रादर्भाव लक्षात घेता मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे, असे म्हटले. या चर्चेत प्रामुख्याने लॉकडाऊन वाढवावा की नाही यावर चर्चा झाली.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात ऑरेंज, ग्रीन आणि रेड असे झोन तयार करण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी सर्व राज्यांना असे आवाहन केले आहे की, जे रेड झोन आहेत त्यांना हळूहळू ऑरेंजमध्ये आणणे आणि नंतर त्याला ग्रीन झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न करणे हे मुख्य लक्ष असले पाहिजे.
आपल्या प्रयत्नांना जलद प्रतिसाद कसा मिळेल याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना सांगितले. तसेच, यासाठी दो गज दुरी या मंत्राचा वापर करत कोरोनावर मात करु असा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.
PM says efforts of States should be directed towards converting the red zones into orange and thereafter to green zones
Our aim must be rapid response, need to follow mantra of ‘do gaz doori’: PM @narendramodi #IndiaFightsCorona
Details: https://t.co/cqHG4SNMs9 pic.twitter.com/dUTssViRvp
— PIB India (@PIB_India) April 27, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.