नवी दिल्ली | जगात कोरोनाने थैमान घातले आहे. जगातील सगळ्याच देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढताच आहे. या कठीण प्रसंगी भारताने काही देशांना मदत केली आहे. औषधांचा पुरवठा करत ही मदत केली आहे. काल (१७ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रप्रमुखांना कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. भारताकडून आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन देणारे ट्विटही पंतप्रधानांनी केले होते.
Had a good discussion with President @CyrilRamaphosa about the COVID-19 challenge, and assured India’s support to South Africa for maintaining essential medical supplies.
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2020
तसेच, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी यांच्याशीही चर्चा करुन त्यांनाही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Discussed on phone with President Abdel Fattah El-Sisi @AlsisiOfficial about the COVID-19 situation in India and Egypt. India will extend all possible support to Egypt’s efforts to control the spread of the virus and its impact.
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.