पोलादपूर | महाबळेश्वरला शनिवारी सकाळी सहलीसाठी जात असताना दापोली कृषी विद्यापीठाच्या ३१ कर्मचा-यांची बस आंबेनळी घाटातील आठशे फूट खोल दरीत कोसळून ३० जणांचा जागीच मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह घाटातून बाहेर काढण्यात ट्रेकर्स आणि एनडीआरएफच्या जवांना यश आले असून बचाव पथकाने शोधकार्य थांबवले आहे. या बसमध्ये एकूण ३१ जणांपैकी ३० जणांचा मृत्यू झाल तर, एक जण सुदैवाने बचावला. हे सर्व जण दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्माचारी होते.
Raigad bus accident: NDRF calls off operation, total 30 bodies have been recovered from the site of the accident. Total 31 people were travelling in the bus when it fell down a mountain road into a gorge in Ambenali Ghat. Only one person survived the accident.
— ANI (@ANI) July 29, 2018
कोकण कृषी विद्यापीठातील चार अधीक्षक सहलीला गेले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. त्याशिवाय चार सहाय्यक अधीक्षक, नऊ वरिष्ठ लिपीक, ११ कनिष्ठ लिपीक, एक लॅबबॉय आणि दोन चालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बचावलेले प्रकाश सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठचे अधीक्षक असून खोल दरीतूनवर आले. त्यानंतर मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करून त्यांनी अपघाताची माहिती दिली.
अपघातातील मृतांची नावे
पंकज कंदम, प्रमोद शिगवण, सचिन गिम्हवणेकर, जयंत चौगुले, सुयश बाळ, संदिप झगडे, संदिप सुवरे, रत्नाकर पागडे, राजाराम गावडे, राजेंद्र रिसबूड, राजेश सावंत, राजु बंडवे, हेमंत सुर्वे, रोशन तबीब, निलेश तांबे, सुनिल साटले, सुनिल कदम, रितेश जाधव, किशोर चौगुले, संतोष जालगावकर, विक्रांत शिंदे, दत्ताराम धायगुडे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, संदिप भोसले, प्रशांत भाविड,संजीव झगडे, सचिन गुजर, संतोष झगडे, सचिन झगडे या आपघातात मृत झालेल्या ३० जणांची नावे आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.