सातारा | महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एक मिनी बस कोसळल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घाटात असलेल्या निसरड्या रस्त्यावरून घसरल्यामुळे ही बस दरीत कोसळली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोसळलेली बस साधारण दोनशे फूट खाली गेल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात ३० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
#Maharashtra: Bus falls down a mountain road in Ambenali Ghat, in Raigad district, several feared injured; NDRF team rushed to the spot of the accident
— ANI (@ANI) July 28, 2018
सदर घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील पोलिस आणि ट्रॅकर्सचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील दरीत अडकलेल्या या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, हे अद्याप समजले नाही. थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल. सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याकडे जाणाऱ्या बसमधून कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीसाठी प्रवास करत होते. दरम्यान, ही बस दापोली येथील असल्याचे बोलले जात आहे.
सध्या हाती आलेल्या माहितीनुसार ४० प्रवाशांसह ही बस २०० फूट दरीत कोसळली होती. आतापर्यंत दरीत कोसळलेल्यांचे ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.