मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पनवेल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. २०१८ साली झालेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अन्वय नाईक यांच्या पत्नीने गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यांनतर पोलीसांनी कारवाई करत अर्णब यांना ताब्यात घेतले आहे. कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी ३०६ कलमाअंतर्गत त्यांना ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता.अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते.
अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीनं अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.
रायगडमधील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने, नंतर 5 मे 2020 रोजी म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला दोन वर्षं झाल्यानंतर अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आणि न्यायाची मागणी केली.त्यावेळी काँग्रेससह विविध पक्षांनी हा मुद्दा उचलला आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाईची मागणी केली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्हीडिओची आणि अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत, 26 मे 2020 रोजी सांगितलं की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले.”
अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अलिबाग पोलिसांकडे होता. या प्रकरणात अलिबाग पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९/२०१८ भादंवि ३०६,३४ प्रमाणे तसेच गु.र.नं. ११४/२०१८ भांदवि कलम ३०२ प्रमाणे असे २ गुन्हे दाखल करण्यात आले होते.”स्वामींनी आपल्या वडिलांची देणी थकवून आपल्या वडील आणि आजीला आत्महत्येस प्रवृत्त केले. ही बाब अलिबाग पोलिसांनी नीट तपासली नाही”, असे गृहमंत्र्यांकडे केलेल्या या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी म्हटले होते. अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली होती.
Arnab Goswami is shouting for Sushant Singh Rajput’s suicide, but what about my husband and mother-in-law who suicided because of Mr. Arnab Goswami?
What is happening to my case? When will justice be granted to our family?
WHY STILL THERE IS NO ACTION? pic.twitter.com/uYtFArl1Hi
— Akshata and Adnya Anvay Naik (@AdnyaAnvayNaik) August 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.