HW News Marathi
महाराष्ट्र

दिवसरात्र आपले रक्षण करणाऱ्या पोलिस कॉन्सटेबलचीही आर्थिक मदत

मुंबई | संपूर्ण देशाता कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने दिवसेंदिवस भीती अधिक वाढत चालली आहे. परंतू कोरोनाच्या या संकटसमयी सरकारसोबत उद्योजक, कलाकार, खेळाडू यांच्यासह सामान्य नागरिक, पोलिस प्रशासन आणि सर्व अत्यावश्यक सेवापुरवणारे लोकं खंबीरपणे उभी आहेत. अनेकांनी अर्थिक मदत केली त्यात दिवसरात्र आपल्या रक्षणासाठी उभे असलेल्या पोलिसांनीही मदत केली आहे.

महाराष्ट्र पोलिस खात्यातील एका हेडकॉन्स्टेबलने आपल्या परीने मदत करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील डोंगरी येथे कार्यरत असलेले हेडकॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी कोरोनाविषाणू विरोधात लढण्यासाठी खारीचा वाटा म्हणून आपल्या बचतीतून मुख्यमंत्री निधीला १० हजारांची मदत केली आहे. डांगरे यांनी मदतीचा धनादेश गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हाती सोपवला आहे. हेडकॉन्स्टेबल डांगरे यांच्या या कार्याचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. तसेच, अनिल देशमुख यांनी कॉन्सटेबलचे महाराष्ट्राच्या जनतेतर्फे त्यांचे कौतुक आणि आभार व्यक्त करणारे ट्विटही केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांच्या लोकल प्रवासावर भाजपा गप्प का? नवरात्रीत मायभगिनींना लाभ झाला नसता का?रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर द्या.

News Desk

…तर विधानसभेत आपणही मेरिटमध्ये येऊ शकतो !

News Desk

सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक

Aprna