HW News Marathi
महाराष्ट्र

तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्याला पोलीस कोठडी!

तुळजापुर। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक करून तुळजापुर न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे . गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याच्या ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348 पुर्णांक 661 ग्रॅम सोने व सुमारे 71 हजार 698 पुर्णांक 274 ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच 71 प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली.

२६ सप्टेंबरपर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी

या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तब्बल वर्षाभरानंतर तुळजापुर पोलीसांनी त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ सप्टेंबरपर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजुम शेख व सहायक पोलीस निरीक्षक रोडगे हे करत आहेत.आरोपी दिलीप नाईकवाडी यांच्या वतीने अॅड प्रसाद जोशी यांनी न्यायालयात युक्तीवाद केला .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खूप अडचणी आल्या मात्र अनुभव सुखद होते, राम मंदिराच्या भूमिपूजनाप्रसंगी खडसेंनी आठवणींना उजाळा दिला

News Desk

राज्यपालांना तर भेटलो पण शरद पवारांशीही बोलणार आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशीही… राज ठाकरे!

News Desk

अंत्योदयाची संकल्पना सर्वसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रतोदचा विशेषांक महत्त्वपुर्ण -अर्थमंत्री मुनगंटीवार

News Desk