HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनाविरोधात केलेल्या आंदोलनामूळे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल 

औरंगाबाद | अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई,मुंबई पोलिस आणि महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेना आणि कंगना आमने सामने आले आहेत. याच मुद्द्यावर औरंगाबादमधील शिवसैनिकांनी कंगनाचा निषेध नोंदवत आंदोलन केले आहे. यामुळे या शिवसैनिकांवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे आमदार अंबादास दानवे यांच्यासह माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाही, शिवसेनेच्याच बाजूने आंदोलन करणाऱ्या शिवसैनिक आमदारावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने, कंगना शिवसेनेला भारी पडू लागली की काय, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. कंगनाच्या मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भातील वक्तव्याचा निषेध केला होता. दरम्यान, सर्वच स्तरांतून कंगणाला टीकांना सामोरे जावे लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्या अटकेत, अलिबाग पोलिसांची कारवाई

News Desk

राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळय़ांवर राज्य करणे सोपे असते – सामना

News Desk

ऑनलाईन शिक्षण असूनही पालकांवर फीसाठी दबाव आणणाऱ्या संस्थांवर कारवाई होणार – वर्षा गायकवाड

News Desk