HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणारच; १६ अटी शर्थीसह मिळाली परवानगी

मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला पोलिसांनी ग्रीन सिग्नल दिला. यामुळे महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची सभा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, पोलिसांनी सभेसाठी १६ अटी ठेवल्या आहेत. पोलिसांनी आज (२८ एप्रिल) सायंकाळी सभेला परवानगी मिळाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, औरंगाबादमधील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानात राज ठाकरेंची सभा होणार आहे. सभा ही सायंकाळी ४. ३० वाजेपासून ते ९.३० दरम्यान आयोजित करण्यात यावी. यासभेत १५ हजारपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करण्यात येऊ नये. आणि सभेत सहभागी होणाऱ्या हुल्लडबाजी, घोषणाबाजी आणि असभ्य वर्तन करू नये. तसेच मनसेचे शिष्टमंडळ सभेसंदर्भात औरंगाबाद पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत.

सभेसाठी या अटी असणार आहेत

  •  ही सभा सायंकाळी ४.३० वाजेपासून ते ९.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात याव
  • सभेत वंश, जात, धर्म, वर्ण, भाषा आणि प्रदेशावरून चिथावणीखोर वक्तव्य करू नये
  •  सभेदरम्यान कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करू नये.
  •  सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करावा
  • सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार म्हणजे चेंगराचेंगरी किंवा गोंधळासारखा प्रकार घडला त आयोजित जबाबदार असणार
  •  सभेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिकेट्स उभारावे.
  • सभेसाठी १५ हजारहून अधिक लोकांना निमंत्रित करण्यात यावे.
  •  सभेसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे.
  •  सभेदरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी स्फोटक बाळगू नये
  • अट २, ३ आणि ४ बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना आयोजकांनी करवण्याची जबाबदारी आहे
  •  सभेत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांचे नावे, मोबाईल नंबर आणि सभेत येणाऱ्या लोकांची संख्या एक दिवस आधी पोलिसांना कळवावी.
  •  सभेदरम्यान रुग्णवाहिका, दवाखाना, पाणी पुरवठा आणि वीजपुरवठा यांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • सभेदरम्यान मिठाई आणि अन्नधान्याचे वाटप होते असेल तर कोणाला विषबाधा होणार नाही यांची काळजी आयोजकांनी घावी
  • सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत यंत्रणेत काही बिघाड झाल्यास पर्याय व्यवस्था आयोजकांनी करावी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामींविरोधात शिवसेनेचा हक्कभंग प्रस्ताव ! सभागृहात प्रचंड गोंधळ…

News Desk

बेळगाव पोटनिवडणुकीत शुभम शेळकेच्या प्रचारासाठी राऊतांपाठोपाठ रुपाली चाकणकरही मैदानात!

News Desk

“…नाही तर सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या”, MPSC च्या विद्यार्थ्यांचा निर्वाणीचा इशारा

News Desk