HW Marathi
महाराष्ट्र

चंद्रपूरमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांना शस्त्र बाळगण्याचे निर्देश

चंद्रपूर | चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काल (बुधवार) पोलीस यंत्रणेला त्यांच्या सुरक्षेसंदर्भात काही निर्देश दिले आहेत. “चंद्रपूर जिल्हा शांत असल्याने पोलीस नाकाबंदीच्या वेळी शस्त्र बाळगत नव्हते. परंतु आता चंद्रपुरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी शस्त्र बाळगावे. त्याचप्रमाणे जर कुणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला तर स्वतःच्या रक्षणासाठी ते त्या शस्त्राचा वापर करू शकतात”, असे निर्देश रेड्डी यांनी दिले आहेत. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या निर्देशांची माहिती दिली आहे.

पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे हे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा (स्कॉर्पिओ) पाठलाग करत असताना त्याच वाहनाने त्यांना चिरडल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी (६ नोव्हेंबरला) सकाळी ही घटना घडली आहे. छत्रपती किसनराव चिडे यांची एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख होती.दारूची वाहतूक करणारे वाहन रस्त्यावर थांबलेले असताना गाडीतून पाठलाग करणारे पोलिस गाडीतून खाली उतरून त्या गाडीच्या दिशेने चालू लागले. तितक्यातच दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीने रिव्हर्स घेवून पोलिसांच्या अंगावर घातली. दुर्दैवाने छत्रपती चिडे या गाडीखाली चिरडले गेले.

Related posts

नालासोपारा स्फोटके प्रकरणात श्रीकांत पांगारकरची आर्थिक मदत | सीबीआय

अपर्णा गोतपागर

सेना-भाजपमध्ये युतीचा तिढा अखेर सुटला ?

News Desk

Maratha Reservation | डॉ. हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड

News Desk