HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

होम क्वॉरंटाईनमध्ये राहायला सांगितलेल्या व्यक्तींना पोलिस ट्रॅक करणार

मुंबई | कोरोनाबाधित देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवस घरात एकांतात राहाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यासाठी त्यांच्या हातावर शिक्काही मारला जात आहे. अशा व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी मोबाईल ट्रॅकिंग करण्यात येत असून ते बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना सक्तीने रुग्णालयात भरती केले जाऊ शकते, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

बाधित देशातून मुंबईत आलेले सुमारे ४१३ नागरिक पालिकेच्या निगराणीखाली आहेत. मात्र, काही नागरिक बाहेर फिरत असून घरातच इतरांच्या भेटीगाठी घेत आहेत. घराबाहेर फिरणारा ‘होम कॉरंटाईन’चा प्रवासी लक्षात यावा म्हणून राज्य सरकारने त्यांच्या हातावर शिक्के मारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार असे शिक्केही मारले जात आहेत.

मात्र, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या प्रत्येक प्रवाशाचा मोबाईल ट्रॅक केला जाणार आहे. तसेच, पालिकेचे पथकही त्यांचा पाठपुरावा करणार आहे. पनवेलमध्ये काही संशयित रुग्ण क्रिकेट खेळत असल्याचे आढळले होते; तर मुंबईतही होम कॉरंटाईनमध्ये असलेल्या काही व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्या आहेत. मुंबई महानगर पालिका या व्यक्तीचे मोबाईल क्रमांक पोलिसांना देणार असून पोलिस त्यांचे

Related posts

Live Update : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न, २८२ आमदारांनी घेतली शपथ

News Desk

वेतन पडताळणी पथक १८ ते २१ जुलै दरम्यान नांदेडच्या दौऱ्यावर 

News Desk

नायर हॉस्पिटलमधील एमआरआय मशिनमध्ये अडकून तरूणाचा मृत्यू

अपर्णा गोतपागर