HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… राज्य मंत्रिमंडळातील ‘त्या’ १३ नव्या मंत्र्यांची पार्श्वभूमी

मुंबई | राज्य सरकारचा बहुप्रतीक्षित असा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (१६ जून) सकाळी राजभवनावर पार पडला आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी १३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर, अविनाश महातेकर यांच्यासह १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात सामील झालेल्या या नव्या १३ मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते.

  • राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधीपक्ष नेते

विरोधी पक्षनेते पदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा, नुकताच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश

१९९७ साली शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेत १९९७ – १९९९ मंत्री

१९९९ पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल

२०१४ साली विरोधी पक्षनेतेपदी निवड, २०१९ साली विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

 

  • जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)

    राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत नुकताच शिवसेनेत प्रवेश

    प्रथम २००९ साली त्यानंतर पुन्हा २०१९ साली विधानसभेवर निवड

    सुरुवातीच्या काळात पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य

    आघाडी सरकारच्या कार्यकाळात उर्जा, पर्यटन, उच्च व तंत्र शिक्षण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

    विधानसभेतील राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते

 

  • तानाजी सावंत (शिवसेना)

    २०१५ साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश

    राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील गटाचे समर्थक म्हणून ओळख

    शिक्षण व साखर सम्राट म्हणून त्यांची ओळख

    शिवसेनेचे उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख.

    यवतमाळमधून शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार

 

  • आशिष शेलार (भाजप)

मुंबई भाजप अध्यक्ष

मुंबईतल्या वांद्रे मतदारसंघाचे आमदार

अभाविपच्या मुंबई संघटनमंत्री पद

मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम

 

  • अतुल सावे (भाजप)

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार

औरंगाबाद भाजप शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष म्हणून काम

 

  • सुरेश खाडे (भाजप)

    सातारा जिल्ह्यातील माणचे आमदार

    पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा अनुसुचित जातीचा चेहरा म्हणून ओळख

    सांगली मिरज-कुपवाड मनपावर भाजपची सत्ता आणण्यात महत्वाचे योगदान

    सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना भाजपकडून सलग ३ वेळा आमदार

 

  • परिणय फुके (भाजप)

भाजपचा तरुण चेहरा म्हणून ओळख

२००७ साली नागपूर महापालिकेत नगरसेवक

महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी काम

२०१६ साली भाजपकडून विधानपरिषदेवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय

 

  • डॉ. अशोक उईके (भाजप)

भाजपचा सामान्य कार्यकर्ता,आमदार ते मंत्री असा प्रवास

२०१४ साली वसंत पुरके यांचा पराभव करून विजयी

विधिमंडळच्या आदिवासी विकास समितीचे प्रमुख

भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष

 

  • अविनाश महातेकर (भाजप)

    आंबेडकरी अनुयायी

    दलित पॅँथरचे संस्थापक सदस्य

    रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून कार्यरत

    १९९० साली प्रकाश आंबेडकरांना सोडून दिली रामदास आठवलेंची साथ

 

  • अनिल बोंडे (भाजप)

अमरावतीतील मोर्शी मतदारसंघाचे भाजप आमदार

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल, विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उठवला आवाज

२००२ ते २००५ अमरावती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष

२००९ साली शिवसेनेकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत विजयी

२०१४ साली भाजपमध्ये प्रवेश

 

  • संजय उर्फ बाळा भेगडे (भाजप)

भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष

पुण्याच्या ग्रामीण भागात उल्लेखनीय काम

मावळ मतदारसंघात भाजपकडून सलग २ वेळा आमदार

 

  • योगेश सागर (भाजप)

    भाजप आमदार

    मुंबईतील चारकोप मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेवर

 

  • डॉ. संजय कुटे (भाजप)

    जळगाव-जामोद मतदारसंघाचे आमदार

    २०१० साली बुलडाण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष

    मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय

    प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीस

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या दोन गटात सेनेचे उमेदवार विजयी!

News Desk

‘राजीनामा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला, ती पहिलीच वेळ असावी’ – संजय राठोड

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी खासदारांना संभाजीराजे छत्रपती यांचे पत्र

News Desk