HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय नेत्यांचे डॉ. बाबासाहेब आबंडकरांच्या स्मृतीस अभिवादन

मुंबई | भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांची आज (१४ एप्रिल) जयंती. अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस फुले वाहून अभिवादही केले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घरीच बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत, नागरिकांनाही घरीच राहून जयंती साजरी करण्याचे आवाहन केले.

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंत्रालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन वंदन केलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला घरातंच थांबून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. आज मंत्रालयातही कोरोना अनुषंगानानं सुरक्षिततेची काळजी घेऊनच हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मंत्रालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन अभिवादन केले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटरच्या माध्यमातुन या महामानवास अभिवादन केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांचा वारसा संग्राम देशमुख चालवणार ? पुणे पदवीधरसाठी भाजपचे उमेदवार !

News Desk

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२ योजने’ ची अधिसूचना जारी

Aprna

दहावीचा निकाल जाहीर, एकूण राज्याचा निकाल 99. 95 टक्के

News Desk