HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला, गणपतराव देशमुखांना नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई | ज्येष्ठ नेते आणि राजकारणी गणपतराव देशमुख यांचा काल(३० जुलै) निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने अनेक राजकारण्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. गणपतराव आबांच्या निधनाने मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली

महाराष्ट्राचे उपमुख्यमनातरी अजित पवार यांनी ट्विट करून गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं.महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला.

कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्मरण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव ( आबा ) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत झाला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी 55 वर्षे प्रतिनिधीत्व केले. सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृत शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाही तर महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे . गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहेच. शिवाय त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला अशा शब्दात आपल्या शोक भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला. विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छगन भुजबळ पुन्हा दिल्ली दौऱ्यावर OBC आरक्षणासाठी घेणार महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी!

News Desk

अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा  लवकर उपलब्ध कराव्या! – देवेंद्र फडणवीस

Aprna

कडकनाथ कोंबडी घोटाळ्याने घेतला पहिला बळी

swarit